Hasan Mushirf : हसन मुश्रीफ मंत्रिपदाचा राजीनामा देणार? संजय राऊत यांच्या ‘त्या’ आरोपांवर नेमकं काय म्हणाले?
कॅबिनेटमध्ये गॅंगवॉरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या प्रमुखपदी बसण्याचा त्यांना अधिकार नाही, अशीही टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. तर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई, ९ नोव्हेंबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुणी जुमानत नाही. कॅबिनेटमध्ये गॅंगवॉरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्याची परिस्थिती असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला होता. तर मुख्यमंत्री जर आपल्या मंत्र्यांवरती नियंत्रण मिळू शकत नाहीत. तर राज्याच्या प्रमुखपदी बसण्याचा त्यांना अधिकार नाही, अशीही टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. तर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, असा कोणताही वाद झाला नाही. सगळ्याच मंत्र्यांनी संयमाने बोलावं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सांगितलं आहे. अंगावर धावून जाणं वगैरे असं काही झालं नाही. संजय राऊत सिद्ध करु शकले तर आम्ही मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे थेट म्हणाले.