मटणापेक्षाही मशरूम महाग! मशरूम विक्रीतून विक्रेत्यांला ‘अच्छे दिन’, किती मिळतोय मशरूमला भाव?
VIDEO | काय म्हणता मटणापेक्षाही महाग? मटणाला तोडीस तोड म्हणून मशरूमची गणना, गोंदिया जिल्ह्यामधील बाजारपेठेत मटणापेक्षाही दुप्पट पटीने मशरूम विकला जात आहे. तब्बल 1200 रुपये प्रति किलोने होतेय विक्री
गोंदिया, 16 ऑगस्ट 2023 | गोंदिया जिल्ह्यामधील बाजारपेठेत मटणापेक्षाही दुप्पट पटीने मशरूम विकला जात आहे. तब्बल 1200 रुपये प्रति किलोने विक्री सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मशरूमची विक्री सुरू आहे. गोंदिया शहरातील जंगली मशरूमची मटणापेक्षा जास्त दराने विक्री सुरू असल्याचे निदर्शनात आले आहे. प्रती किलो मशरूमसाठी 1200 ते 1300 रुपयांचा दर मिळत आहे. सध्या मटण 650 रुपये किलो आहे. तर मटणापेक्षा दुप्पट पटीने महाग दराने मशरूम मिळत आहे. पाऊस सुरू झाला आणि विजेचा गडगडाट होताच बाजारपेठेत जंगली मशरूम विक्रीसाठी आले आहे. सध्या या जंगली मशरूमला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. सोबतच चांगला दरदेखील मिळत असून 1200 ते 1300 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. मटणाला तोडीस तोड म्हणून मशरूमची गणना होते असे खवैये सांगतात. नैसर्गिक वन संपदेने नटलेल्या जिल्हा मध्ये ही जंगली मशरूम विक्रीला येते.
मशरूम हे आरोग्यासाठी पोषक मानले जाते. पूर्व विदर्भातील जंगल परिसरात मशरूम मोठ्या प्रमाणावर उगवते. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील जंगलात हे मशरूम पाहायला मिळते. विशेषत: बांबू म्हणजे जंगलात याचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. श्रावण महिन्यात नागरिक मांसाहार करत नाहीत. त्यामुळं या काळात मशरूमला मोठी प्रमानात मागणी असते. आयुर्वेदिक साठी देखील मशरूमचे मोठे महत्त्व आहे. शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून आपले पीक चर्चेत आणत असतो. आता चर्चेत असलेले पीक म्हणजे मशरूमची शेती. सध्या गोंदिया शहरातील बाजारपेठेत जंगली मशरूमला मटणापेक्षा प्रति किलो दुप्पट दर असल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा होत आहे. तसेच मशरूमच्या विक्रीतून विक्रेत्याला चांगलीच कमाई करत आहेत. जुलै शेवट ते संपूर्ण ऑगस्ट महिन्यात मशरूमची जास्तच मागणी असते…..