महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार, शिवसेनेला आमचा पाठिंबा – शंकरराव गडाख
"आम्ही आज नाही, दोन दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीच्या प्रकियेमध्ये आहोत. काल महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या, अपक्ष समर्थन देणाऱ्या सगळ्या आमदारांची बैठक झाली"
मुंबई: “आम्ही आज नाही, दोन दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीच्या प्रकियेमध्ये आहोत. काल महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या, अपक्ष समर्थन देणाऱ्या सगळ्या आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीला असलेली उपस्थिती पाहता, महाविकास आघाडीने राज्यसभा निवडणूक जिंकल्यात जमा आहे” असं आमदार शंकरराव गडाख म्हणाले. “24 वर्षानंतर प्रथमच राज्यसभेची निवडणूक होत आहे. त्यातले बारकावे पाहवे लागतील. पसंती क्रमांक द्यावा लागतो. एकही मत बाद होता कामा नये, त्यासाठी रणनिती आखावी लागेल” असं आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितलं.
Published on: Jun 08, 2022 06:12 PM