मविआमध्ये 85 चा फॉर्म्युला, 270 जागांवर निघाला तोडगा तर 110 ची अपेक्षा असलेल्या काँग्रेसचं नुकसान?

| Updated on: Oct 24, 2024 | 12:05 PM

महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत २७० जागांवर तोडगा निघू शकला. त्यातही प्रत्येकाच्या वाटेला ८५ जागा आल्यात. तर ११० जागांची अपेक्षा असलेल्या काँग्रेसला मात्र १०० च्या आतच जागा मिळतील असं चित्र सध्या पाहायला मिळतंय.

राज्यातील १८ जागा सोडून महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालं आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीमध्ये एकूण २७० जागांवर तोडगा निघाला आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्या वाटेला ८५ जागा आल्यात. १५ जागांचं वाटप बाकी असून १८ जागा मित्रपक्षांना देण्यावर चर्चा सुरू आहे. दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना या पक्षाने यादी जाहीर केली असून आदित्य ठाकरे यांना वरळीतून तर वांद्रे पूर्व येथून वरूण सरदेसाई यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना विरूद्ध शिवसेना अशा काही लढती फिक्स झाल्या आहेत. त्यापैकी कोपरी पाचखाडीमधून एकनाथ शिंदे विरूद्ध केदार दिघे यांच्यात थेट सामना रंगणार आहेत. रामटेकमध्ये आशिष जैस्वाल विरूद्ध विशाल बरबटे, कळमनुरीमध्ये संतोष बांगर विरुद्ध संतोष टरफे, सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार विरूद्ध सुरेश बनकर, छत्रपतीसंभाजीनगर येथे संजय शिरसाट विरूद्ध राजू शिंदे, नांदगावमध्ये सुहास कांदे विरूद्ध गणेश धात्रक, मालेगावमध्ये दादा भूसे विरूद्ध अद्वैय हिरे, ओवळा माजीवाडामध्ये प्रताप सरनाईक विरूद्ध नरेश मनेरा यांच्यात सामना रंगणार आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 24, 2024 12:05 PM
राज ठाकरेंचं इंजिन धावणार की इतरांना रोखणार? ‘या’ जागांवर पहिल्यांदाच मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
लोकसभेनंतर विधानसभेला बारामतीत घरातच लढाई, काका vs पुतण्या रिंगणात; कोणाला कोण पडणार भारी?