My India My Life Goals | गंगा नदीचा काठ स्वच्छ करुन ती प्रदूषणमुक्त करण्यासाठी जनजागृती करणारे राजेश शुक्ला

| Updated on: Aug 07, 2023 | 5:03 PM

सर्व भारतीयांनी पर्यावरण स्वच्छ ठेवून निरोगी राष्ट्र निर्माण केले पाहिजे, असे राजेश शुक्ला दररोज लोकांना सांगत जनजागृती करत आहेत.

Green Warriers : व्हिडिओमध्ये स्कूटर चालवत असणारे गृहस्थ आहेत राजेश शुक्ला. ते कोणी प्रसिद्ध व्यक्ती नाही पण ते जे करत आहेत ते प्रसिद्ध लोक देखील करत नाहीत. राजेश शुक्ला हे पहाटे 5 वाजता घरातून निघतात. आपल्या टीम सदस्यांसह दररोज पवित्र गंगा नदीचा किनारा स्वच्छ करतात. ते म्हणतात. सुमारे तीन तास नदीचा किनारा स्वच्छ करणे हा त्यांचा नित्यक्रम बनला आहे. स्वच्छतेच्या कामानंतर नदीत पवित्र स्नान आणि पूजेसाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करण्याचे काम केले जाते.

पॉलिथिन प्लास्टिक पिशव्या, कचरा आदी नदीत टाकू नका, ते पर्यावरणाला घातक आहे, अशा घोषणा मायक्रोफोनद्वारे करून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या आपण सर्व भारतीयांनी पर्यावरण स्वच्छ ठेवून निरोगी राष्ट्र निर्माण केले पाहिजे, असे ते दररोज लोकांना सांगत जनजागृती करत आहेत.

Published on: Aug 07, 2023 05:03 PM
धक्कादायक ! पोषण आहाराच्या नावानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ ! निष्कृष्ट दर्ज्याच्या साहित्याचा पुरवठा
My India My Life Goal | पद्मश्री थिम्मक्का यांचा अभिमान, वयाच्या 112 व्या वर्षीही पर्यावरण रक्षणासाठी लावताय झाडे