N D Patil  | शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

N D Patil | शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

| Updated on: Jan 18, 2022 | 10:22 AM

शेकापचे ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्यावर आज कोल्हापूरमधील अंत्यसंस्कार पार पडतील. शाहू मैदानात एन.डी. पाटील यांचं पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे.

शेकापचे ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्यावर आज कोल्हापूरमधील अंत्यसंस्कार पार पडतील. शाहू मैदानात एन.डी. पाटील यांचं पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शाहू कॉलेजच्या मैदानावर उपस्थित आहेत. एन.डी. पाटील यांच्या पार्थिवाचं अंत्य दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ देखील उपस्थित आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत 20 जणांच्या उपस्थितीत एन.डी. पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

देहूगाव नगरपंचायतीसाठी मतदान, सुनील शेळके बाळा भेगडे यांची प्रतिष्ठा पणाला
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली