मुंबई, ८ फेब्रुवारी, २०२४ : मंत्री छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला होता. छगन भुजबळ यांनी केलेल्या त्या वक्तव्यानंतर नाभिक समाजाने आता विरोध दर्शविला आहे. दरम्यान, वादग्रस्त विधानानंतर छगन भुजबळ यांनी माफी देखील मागितली होती. आपण केलेलं विधान हे गावापुरतं होतं. तर सर्वसमावेशन नसल्याचा खुलासा भुजबळ यांनी केला. मात्र हक्काची लढाई मांडताना सत्तेतील नेत्यांनी दुई माजेल अशी विधानं करू नये, म्हणून सामान्य लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, प्रकाश शेंडगे यासंदर्भात बोलतात एका तरूणाने तसा मेसेज व्हायरल केला होता. तर भुजबळ म्हणतात तिथल्या मराठा लोकांनी तसा मेसेज पाठवला मात्र एक तरूण किंवा गावातील काही लोक यांनाच जर आपण संपूर्ण समाजाची भूमिका असं गृहित धरू लागलो तर मग गावागावात जातीची भांडणं पेटतील. बघा भुजबळ नेमकं काय म्हणाले?