उपायुक्तांसह अधिकाऱ्यांकडून बलात्कार, महिला पोलिसांच्या ‘लेटरबॉम्ब’मुळे पोलीस दलात खळबळ
कायदा-सुव्यस्थेचं संरक्षण करणाऱ्यांवर बलात्काराचे गंभीर आरोप, 'त्या' महिला पोलिसांचं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना थेट पत्र...मुंबईच्या नागपाडामधील मुंबई पोलीस दलाच्या ट्रान्सफर डिपार्टमेंट आठ महिला पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे पत्र लिहिलं आहे. एक पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरिक्षक आणि आणखी एका अधिकाऱ्यावर या महिला पोलिसांनी आरोप केले आहेत.
मुंबई, ८ जानेवारी २०२४ : महाराष्ट्रातील पोलीस दलात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील आठ महिलांकडून पोलीस अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या महिला पोलिसांकडून पोलीस उपायुक्तांसह तीन अधिकाऱ्यांकडून बलात्कार होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आठ महिला याबाबत पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. मुंबईच्या नागपाडामधील मुंबई पोलीस दलाच्या ट्रान्सफर डिपार्टमेंट आठ महिला पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे पत्र लिहिलं आहे. एक पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरिक्षक आणि आणखी एका अधिकाऱ्यावर या महिला पोलिसांनी आरोप केले आहेत. तर या गंभीर घटनेबाबत महिला पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. या घटनेची वरिष्ठ तपास यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी या महिला पोलिसांनी केली आहे. दरम्यान या पत्राची गंभीर दखल घेण्यात आली आहे आणि चौकशीही सुरु करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.