नाशिक आणखी ‘या’ मोठ्या शहरांना जोडणार, १५ मार्चपासून विमानसेवा सुरू
१५ मार्चपासून नाशिकहून नागपूर, अहमदाबाद आणि गोवा विमानसेवेला सुरूवात, या विमान सेवेचे तिकीट बुकिंग इंडिगोकडून २ फेब्रुवारीपासून सुरू
नाशिक : १५ मार्चपासून नाशिकहून नागपूर, अहमदाबाद आणि गोवा विमानसेवेला सुरूवात होणार आहे. तर या विमान सेवेचे तिकीट बुकिंग इंडिगोकडून २ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले आहे. या विमानसेवेमुळे नाशिक आणखी दोन मोठ्या शहरांना जोडले जाणार आहे. इंडिगोकडून येत्या १५ मार्चपासून ओझर विमानतळाहून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून इंडिगोची नाशिकला प्रतिक्षा होती, आता इंडिगोकडून नागपूर, अहमदाबाद आणि गोवा या मोठ्या शहरांसाठी ही सेवा पुरवली जाणार आहे. सध्या या कंपनीची नाशिक-हैदराबाद, नाशिक-दिल्ली या दोन शहरांची विमान सेवा सुरू आहे. मात्र यानंतर या कंपनीने आणखी तीन मोठ्या शहरांसाठी सेवा सुरू करण्याचे पत्र हवाई वाहतूक मंत्रालय आणि ओझर येथील नाशिक विमानतळ प्रशासनाला दिले त्यानंतर विविध ठिकाणी सुविधा आणि सहकार्यासाठीही पुढाकार घेतला आहे.
Published on: Feb 04, 2023 09:03 AM