VIDEO : वकीलांवर होत असलेल्या कारवाईचा Nagpur वकील संघटनांकडून निषेध
प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरी गुरुवारी सकाळीच ईडीनं धाड टाकली. सकाळपासून चौकशी सुरू होती. त्यानंतर आता ईडीनं सतीश उके यांना ताब्यात घेतलं. सकाळपासून पाच तास चौकशी करण्यात आली. सतीश उके आणि प्रदीप उके यांना ईडीच्या ताब्यात घेण्यात आलंय. सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार ही सर्व कारवाई होत आहे. असा आरोप उके यांच्या कुटुंबीयांनी केलाय.
प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरी गुरुवारी सकाळीच ईडीनं धाड टाकली. सकाळपासून चौकशी सुरू होती. त्यानंतर आता ईडीनं सतीश उके यांना ताब्यात घेतलं. सकाळपासून पाच तास चौकशी करण्यात आली. सतीश उके आणि प्रदीप उके यांना ईडीच्या ताब्यात घेण्यात आलंय. सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार ही सर्व कारवाई होत आहे. असा आरोप उके यांच्या कुटुंबीयांनी केलाय. तर वकीलांवर होत असलेल्या कारवाईचा Nagpur वकील संघटनांकडून निषेध करण्यात आला आहे. उके यांचे कुटुंबीय म्हणले, आज सकाळी साडेपाच वाजता आम्ही झोपेत होतो. ईडीचे अधिकारी मुंबईचे आहेत म्हणून मोठी पोलीस फोर्स घेऊन आले. तेव्हा आम्ही झोपेत होतो. आमचे सर्वांचे मोबाईल जमा केले.