पुन्हा अवकाळीचं संकट? राज्यातील ‘या’ जिल्ह्यात २८ एप्रिलपर्यंत यलो अलर्ट

| Updated on: Apr 25, 2023 | 9:00 AM

VIDEO | राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट कोसळणार, कोणत्या जिल्ह्याला हवामान खात्यानं दिला यलो अलर्ट

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटने नागरिकांना हैराण करून सोडले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील पुढील पाच दिवस गारपिटीसह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता नागपूरसह विदर्भात वर्तवण्यात आली असताना आता हवामान विभागाकडून नागपूर विभागात २८ एप्रिलपर्यंत पावसाचा यलो अलर्ट असणार आहे. त्यामुळे नागपूरसह आसपासच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपातील मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आल्याने फळबागायतदार पुन्हा एकदा चिंतेत आले आहेत. काल नागपुरमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळाल्याने नागपूरचं तापमान ६ अंशाने कमी देखील झाले होते.

Special Report | मोदी यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा निशाणा अन् एकनाथ शिंदे यांचा भडका, काय आहे प्रकरण?
अन् महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धरले सुशीलकुमार शिंदे यांचे पाय