नागपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा छोटू भोयर ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुखांना पाठिंबा

| Updated on: Dec 09, 2021 | 10:02 PM

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसवर (Congress) उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. काँग्रेसनं छोटू भोयर (Chotu Bhoyar) यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या (Legislative Council Election) पार्श्वभूमीवर नागपुरात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसवर (Congress) उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. काँग्रेसनं छोटू भोयर (Chotu Bhoyar) यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसं पत्रक काँग्रेसकडून काढण्यात आलं आहे. उमेदवार बदलाबाबत मागील दोन दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर आज अखेर काँग्रेसनं आपला उमेदवार बदलला आहे.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार बदलण्याचा प्रस्ताव हायकमांडकडं पाठवण्यात आला होता. त्यानंतर दिल्लीतून या निर्णयाला मंजुरी दिली. छोटू भोयर ताकदीने निवडणूक लढत नसल्याचा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आरोप होता. त्यामुळे उमेदवार बदलण्याचा प्रस्ताव पाठवल्याचं काँग्रेसच्या गोटात बोललं जातं होतं. अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन देण्यावर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचं एकमतही झालं होतं. मात्र, छोटू भोयर यांनी या सर्व चर्चेचं खंडण करत, मीच काँग्रेसचा उमेदवार असून, उमेदवार बदलाचा कुठलाही प्रस्ताव हायकमांडकडं गेला नसल्याचा दावा केला होता.

Jitendra Awhad | 2024 ला सुद्धा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार : जितेंद्र आव्हाड
Special Report | अपघातात शहीद झालेले ‘द ग्रेट वॉरियर’