राज ठाकरे यांचा ताफा अडवला तर… विदर्भ दौऱ्याआधीच ‘मनसे’कडून इशारा
बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकल्या. यानंतर आता राज ठाकरे विदर्भ दौरा करणार आहे. दरम्यान, विदर्भात जर राज ठाकरेंचा तोफा अडवला तर जागेवर चोर देणार, असा इशाराच मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
बीडसारखं सुपाऱ्यांनी हल्ला करून विदर्भात आंदोलन केलं आणि राज ठाकरेंचा ताफा जर कोणी अडवला तर जागेवर चोपणार असा इशारा नागपूरचे मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरूगकर यांनी दिला आहे. मराठवाड्यात राज ठाकरेंचा दौरा असताना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या इतकंच नाहीतर त्यावेळी सुपारीबाज अशा घोषणाही दिल्यात. त्यानंतर ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्याची प्रतिक्रिया देण्यात आली. ठाण्यात मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण, नारळ आणि बांगड्या फेकल्या. आता येत्या २१ तारखेपासून राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पुन्हा जर राज ठाकरेंचा ताफा अडवला तर चोप देणार असल्याचा इशाराच विदर्भातील मनसेकडून देण्यात आला आहे. मात्र बीडमध्ये सुपारी फेकणारे आमचे कार्यकर्ते नव्हतेच, मग आम्हाला आव्हान का देताय? असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.