Nagpur E-Bus | नागपूरकरांच्या सेवेत १५० ई-बसेस येणार, महापालिकेचा सरकारला प्रस्ताव
VIDEO | नागपुरकरांसाठी आनंदाची बातमी, वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नागपूर महापालिकेने घेतला पुढाकार, नागपूरकरांच्या सेवेत आता १५० ई-बसेस येणार, मनपानं केंद्र सरकारला पाठवला प्रस्ताव
नागपूर, १६ सप्टेंबर २०२३ | नागपुरकरांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. कारण आता नागपुरकरांच्या सेवेत १५० इलेक्ट्रीक बसेस दाखल होणार आहे. यासंदर्भात नागपूर महानगर पालिकेने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. राज्याची उपराजधानीतील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मनपाने पुढाकार घेतला आहे. याकरता केंद्र सरकारच्या योजनांमार्फत १५० ईलेक्ट्रिक बसेसची मागणी केली आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत पीएम ईबस योजना सुरू करण्यात आली आहे. यानंतर नागपूर महापालिकेलाही ई बसेस मिळव्यात म्हणून राज्य सरकारला महानगरपालिकेद्वारे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. सध्या नागपुरात मनपाच्या परिवहन विभागातर्फे सार्वजनिक बस सेवा डिझेल इंधनावरून अपारंपारिक इंधनाकडे वळवण्यात येणार असल्याचे धोरण आता राबविण्यात येत आहे. त्यामुळे आपली बसच्या ताफ्यात ई बसेसचा समावेश करण्यात आलेला आहे.