Nagpur : कोर्टाचे निर्देश पाळण्याचं नागपूर पोलिसांचं आवाहन, धार्मिक स्थळांवरील भोंग्यांची माहिती घेण्यास सुरुवात

| Updated on: Apr 28, 2022 | 12:16 PM

नागपुरात धार्मिक स्थळांवरील भोंग्यांची माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलाय.

नागपूर : भोंग्यांवरुन (Loudspeaker) जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून गृहविभाग अलर्टवर आहे. राज्यात ठिकठिकाणी भोंग्यांसंदर्भात नियमांचे पालन केलं जातंय की नाही, याची खातरजमा केली जात आहे. यातच कोर्टाचे (Court) निर्देश पाळण्याचं नागपूर पोलिसांचं (Police) आवाहन आहे. नागपुरात धार्मिक स्थळांवरील भोंग्यांची माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. नागपुरात 893 मंदिर आणि 383 मशिदी आहेत.

Published on: Apr 28, 2022 12:16 PM
Aurangabad : औरंगाबादच्या 1 हजार 601 धार्मिक स्थळांकडे भोंग्यांची परवानगी नाही, पोलीस आयुक्त कार्यालयाची माहिती
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 28 April 2022