मुसळधार पावसानं नागपूरची उडाली दैना, पुरावरून विरोधकांचे वार तर सत्ताधाऱ्यांचे पलटवार

मुसळधार पावसानं नागपूरची उडाली दैना, पुरावरून विरोधकांचे वार तर सत्ताधाऱ्यांचे पलटवार

| Updated on: Sep 25, 2023 | 9:11 AM

VIDEO | अवघ्या चार तासात झालेल्या तब्बल 110 मिलिमीटर पावसानं नागपुरकरांची उडवली दाणादाण, नागपुरातील अंबाझरी तलाव, वर्मा ले आऊट, डागा ले आऊट, समता नगर, शंकरनगर, सीताबर्डी, पंचशील चौक, नंदनवन, वर्धमाननगर, कळमना, पारडी अनेक भागात पाणीच पाणी

मुंबई, २५ सप्टेंबर २०२३ | अवघ्या चार तासाच्या पावसानं नागपूरची चांगलीच दैना झाली. शहराचा बहुतांश भाग पाण्याखाली गेला तर घरांचंही मोठं नुकसान झालं. आता नेत्यांचे पाहणी दौरे सुरु झालेत आणि त्यावरुन राजकारणही रंगल्याचे पाहिला मिळत आहे. अवघ्या चार तासात झालेल्या तब्बल 110 मिलिमीटर पावसानं नागपूरची ही अशी दाणादाण उडवली. नागपुरातील अंबाझरी तलाव, वर्मा ले आऊट, डागा ले आऊट, समता नगर, शंकरनगर, सीताबर्डी, पंचशील चौक, नंदनवन, वर्धमाननगर, कळमना, पारडी अशा अनेक भागात पुराचं पाणी शिरलं. रस्त्यांवर उभी असलेली वाहनं वाहून गेली. अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडली. पुराच्या पाण्यानं घरातील सर्व साहित्याचं तर नुकसान झालंच, पण अनेकांचे संसारही उघड्यावर आलेत. पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापनासह एनडीआरच्या टीमला तैनात करण्यात आलं.

Published on: Sep 25, 2023 09:06 AM
आमदार अपात्रतेबाबत आज पुन्हा सुनावणी, काय होणार फैसला? विधानसभा अध्यक्षांकडे महाराष्ट्राचे लक्ष
लोकसभा निवडणूक माधुरी दीक्षित लढणार? भाजपकडून होतेय ‘या’ नवख्या 4 चेहऱ्यांची चर्चा