नागपूरच्या ‘या’ चहावाल्याची देवेंद्र फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
शपथविधीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडूनही वेगवान हालचाली सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीच्या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकाऱ्यांसह या शपथविधीच्या सोहळ्यासाठी साधू-महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही निमंत्रण
येत्या 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात संध्याकाळी पाच वाजता नव्या सरकारचा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरु आहे. शपथविधीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडूनही वेगवान हालचाली सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीच्या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकाऱ्यांसह या शपथविधीच्या सोहळ्यासाठी साधू-महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे. अशातच नागपुरातील देवाभाऊंचा फॅन अन् चहावाल्याची दखल देखील भाजपकडून घेण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूरमधील गोपाळ नावाच्या चहावाल्याला भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याचे विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. ‘येत्या 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या शपथविधीसोहळ्यासाठी भाजपकडून आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पास पाठवण्यात आला आहे. मी नक्की त्या शपथविधीला हजर राहणार आहे. एक चहावाला म्हणून मला त्या शपथविधीला आमंत्रित केल्याने मी आनंदी आहे.’, असे नागपूरच्या या चहावाल्याने म्हटलं आहे.