Nagpur Breaking | नागपुरातील व्यापाऱ्यांची आक्रमक भूमिका, सरकारच्या निर्बधांविरोधात बाईक, कार रॅली
नागपुरातील निर्बंध कमी करण्यात यावे या साठी व्यापारी आता थेट रस्त्यावर उतरले आहेत. व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
नागपुरातील निर्बंध कमी करण्यात यावे या साठी व्यापारी आता थेट रस्त्यावर उतरले आहेत. व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत व्यापारी पद यात्रा काढली होती. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात व्यापारी सहभागी झाले आहेत. पद यात्रा आंदोलनानंतर आज व्यापाऱ्यांनी बाईक आणि सायकल रॅली काढली होती. यातही मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग सामील झाला होता. सरकारच्या निर्बधांविरोधात नागपुरातील व्यापाऱ्यांची आक्रमक भूमिका आज पाहायला मिळाली.