Nagpur Violence : राड्यातील मास्टरमाईंड फहीम खानचं मालेगाव कनेक्शन, पोलिसांसोबत हुज्जत अन् दादागिरीचे व्हिडीओ तुम्ही पाहिलेत?

| Updated on: Mar 20, 2025 | 12:00 PM

नागपूर सायबर पोलिसांकडून रात्री फहीम खानसह ५० आरोपींवर देशद्रोहाचा दाखल करण्यात आला आहे. इतकंच नाहीतर पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या तपासातून एक मोठी माहिती उघड झाली आहे.

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे असणाऱ्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवर सध्या वाद सुरू आहे. याच मुद्द्यावरून नागपुरात दोन गटात तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या राड्याचं रूपांतर हिंसाचारात झालं. दरम्यान, नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंड फहीम खान यांचं नाव समोर आल्यानंतर आणखी एक अपडेट समोर आली आहे. मास्टरमाईंड फहीम खान यांचं मालेगाव कनेक्शन उघड झालं असून गेल्या पाच महिन्यांपूर्वी फहीम खान हा मालेगावात आल्याची माहिती समोर येत आहे. फहीम खान हा मालेगावात आल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष असून विधानसभा निवडणुकीच्या वेळी मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं. नागपुरात राडा होण्यापूर्वी पोलीस ठाण्यात निवेदन दिल्यानंतर फहीम खान जमावासोबत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात आला. यावेळी पोलिसांकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात बसू नये असा सल्ला फहीम खान आणि त्याच्या सोबत असणाऱ्यांना दिला. शिवजंयती असल्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन नको, अशी पोलिसांची भूमिका होती. मात्र यादरम्यान पोलिसांसोबत फहीम खानची पोलिसांसोबत हुज्जत झाल्याची माहिती समोर आली. त्याच वेळाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

Published on: Mar 20, 2025 11:49 AM
Nagpur Violence : नागपूर राड्यातील आरोपी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा, पोलीस तपासातून खळबळजनक माहिती उघड
Nashik Crime : दोन सख्या भावांच्या खुनाने नाशिक हादरलं