नागपूरच्या रँचोची कमाल, भंगार वापरुन बनवली रेसिंग कार
नागपूरच्या एका रँचोने जुगाड तंत्र आणि भंगार वस्तूंचा वापर करत आपलं स्वप्न पूर्ण करत चक्क रेसिंग कार बनवली आहे. ही कार सध्या नागपुरात चर्चेचा विषय बनली आहे.
नागपूर : नागपुरातील स्वप्नील चोपकर या तरुणाने रेसिंग कार बनवली आहे. हा तरुण बी. कॉम. करतोय. मात्र त्याला गाड्या आवडतात. त्याच्या या आवडीमुळे तो गॅरेजमध्ये काम करून मेकॅनिकचं काम शिकला आणि मग तो आपल्या स्वप्नातील फॉर्म्युला वन रेसिंग कार बनवू लागला. त्यानंतर 9 महिने मेहनत घेऊन त्याने एक शानदार कार साकारली. पैसे नसल्याने स्वप्नीलला महागड्या वस्तू वापरता आल्या नाहीत. मात्र त्याने जुगाड तंत्राचा वापर करत भंगारातील साहित्याचा वापर करून गाडीचे पार्ट्स बनवले.