Special Report | त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मांच्या लोकांची जबरदस्तीने घुसखोरी, नेमकं सत्य काय?
VIDEO | त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न? धूप दाखवण्याचा प्रयत्न की चादर चढवण्याचा? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : शनिवारी इतर धर्मियांच्या काही तरूणांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात आत शिरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मंदिर प्रशासनाने केलाय. त्यानंतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या प्रकरणाचं नेमकं सत्य काय आहे. उरूसच्या निमित्ताने दुरूनच धूप दाखवण्याचा प्रयत्न होता का? की आणखी काय प्रकार होता? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. शनिवारी इतर धर्मियांच्या काही तरूणांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात शिरकाव केला. यानंतर ब्राम्हण महासंघाने याबाबत पोलिसांत तक्रार दिली आणि कारवाई करण्याची मागणी केली. सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक SIT स्थापन करण्याचे आदेश दिलेत आणि त्या चौघावर गुन्हा दाखल झाला. कलम २९५ नुसार, पवित्र स्थानाच्या ठिकाणी नुकसान किंवा अपवित्रतेच्या भावनेतून कृती करणे, कलम ५११ अतिक्रमण किंवा घरफोडीच्या उद्देशाने कृती करणे यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर ऊरुस आयोजकांनीदेखील या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. “आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही केवळ मंदिराच्या बाहेरुन धूप दाखवत होतो. ही दरवर्षीची प्रथा आहे”, असं ऊरुस आयोजकांनी सांगितलं. पण शनिवारी त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात्या प्रवेशद्वारावर नेमकं काय झालं? बघा स्पेशल रिपोर्ट..