लोकसभा निवडणूक माधुरी दीक्षित लढणार? भाजपकडून होतेय ‘या’ नवख्या 4 चेहऱ्यांची चर्चा

| Updated on: Sep 25, 2023 | 9:30 AM

VIDEO | आगामी लोकसभेत महाराष्ट्रातल्या ४ जागांवर भाजप नवखे चेहरे देणार? अमित शाहा आणि शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत कोणात्या नावासंदर्भात झाली चर्चा? अभिनेत्री माधुरी दीक्षित, वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा

मुंबई, २५ सप्टेंबर २०२३ | आगामी लोकसभा जस-जशा जवळ येतायत तसंच उमेदवारांच्या नावांच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसताय. कालपासून चार नावांच्या चर्चा जोरदार सुरूये यामध्ये उज्वल निकम आणि माधुरी दिक्षीत हिचं नाव देखील असल्याचे समोर आले आहे. आगामी लोकसभेत महाराष्ट्रातल्या ४ जागांवर भाजप नवखे चेहरे देणार असल्याची चर्चा होतेय. अमित शाहा आणि शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत त्याच ४ नावासंदर्भात चर्चाही झाल्याची माहिती आहे. पहिलं नाव अभिनेत्री माधुरी दीक्षित, दुसरं नाव ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम, तिसरं नाव भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर आणि चौथं नाव माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री मुंबईत होते. लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.

तिथून ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गेले नंतर फडणवीसांच्या सागर बंगल्यावरच्या गणपतीचं शाहांना दर्शन घेतलं. या भेटीगाठींनंतर पुन्हा शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर बंददारआड बैठक झाली. 45 मिनिटं चाललेल्या या बैठकीत शाहा-शिंदे आणि फडणवीसांमध्ये आगामी लोकसभांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या चाचपणीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

Published on: Sep 25, 2023 09:30 AM
मुसळधार पावसानं नागपूरची उडाली दैना, पुरावरून विरोधकांचे वार तर सत्ताधाऱ्यांचे पलटवार
Salman-ShahRukh Khan | भाईजान अन् किंगखान ‘वर्षावर’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचं घेतलं दर्शन