‘त्या’ बछड्यांच्या नामकरणावरुन आरोप-प्रत्यारोप, अजित दादांनी काढली ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी अन्…

| Updated on: Sep 18, 2023 | 8:02 AM

tv9 Special Report | छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातील बछड्यांच्या नामकरणावरून राजकारण चांगलंच रंगलंय. सिद्धार्थ उद्यानातील बछड्याला नाव देताना अजित पवारांनी काढली आदित्य नावाची चिठ्ठी, पुढे काय झालं बघा?

छत्रपती संभाजीनगर, १८ सप्टेंबर २०२३ | वाघाच्या बछड्यांच्या नामकरणावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप रंगल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ३ बछड्यांचं नामकरण झालं. मात्र त्या नामकरणावरुन काय चर्चा झाली आणि तिथं नेमकं काय घडलं? की त्याची इतकी होतेय चर्चा? सध्या प्राण्यांच्या नामकरणावरुनही महाराष्ट्रात राजकारण होतांना दिसतंय. मात्र यानिमित्तानं अजित पवारांच्या स्मरणशक्तीची चर्चा रंगली. झालं असं की छत्रपती संभाजीनगरमधल्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात एका वाघिणीनं 3 बछड्यांना जन्म दिला. त्या तिन्ही बछड्यांचं नामकरण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झालं. काचेच्या 2 पात्रात चिठ्ठ्यांमध्ये वेगवेगळी नावं होती. शिंदे-अजितदादांना त्यातली चिठ्ठी निवडून नाव घोषित करायचं होतं. पहिली चिठ्ठी शिंदेंनी काढली. त्यात श्रावणी नाव निघालं. दुसरी चिठ्ठी काढण्याची शरद पवार यांनी काढली आणि त्यातलं नाव बघताच ते आधी हसले, आणि नंतर काय झालं बघा व्हिडीओ…

Published on: Sep 18, 2023 08:02 AM