Namita Mundada | मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये यावे, नुकसानीची भीषण दृश्य पाहावे : नमिता मुंदडा

| Updated on: Oct 03, 2021 | 7:27 PM

मराठवाड्यात, प्रामुख्यानं बीड जिल्ह्यात शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. असं असतानाही सरकार मदतीसाठी पुढे येत नाही. अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेती उद्ध्वस्त झालीय. अनेक घरांची पडझड झाली आहे. पंकजा मुंडे पालकमंत्री होत्या त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती. विद्यमान पालमंत्र्यांनी अद्याप कसलीही मदत जाहीर केली नाही. राज्यात ओला दुष्काळ अद्याप का जाहीर केला नाही? असा सवाल नमिता मुंदडा यांनी केलाय.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ऐन काढणीवेळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालाय. अशावेळी सरकारनं शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी करत आहेत. बीड जिल्ह्यातही शेतकऱ्याचं शेती पिकांसह शेतजमिनीचंही मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी पालकमंत्री आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केलीय.

मराठवाड्यात, प्रामुख्यानं बीड जिल्ह्यात शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. असं असतानाही सरकार मदतीसाठी पुढे येत नाही. अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेती उद्ध्वस्त झालीय. अनेक घरांची पडझड झाली आहे. पंकजा मुंडे पालकमंत्री होत्या त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती. विद्यमान पालमंत्र्यांनी अद्याप कसलीही मदत जाहीर केली नाही. राज्यात ओला दुष्काळ अद्याप का जाहीर केला नाही? असा सवाल नमिता मुंदडा यांनी केलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्यात यावं. नुकसानाची भीषण दृष्य पाहावीत. पालकमंत्री काय करतात आम्हाला माहिती नाही. मात्र, लोकांना मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांनी प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी नमिता मुंदडा यांनी केलीय.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 3 October 2021
Devendra Fadnavis | जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा : देवेंद्र फडणवीस