नमो महारोजगार’ मेळावा बारामतीत अन् कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब

| Updated on: Feb 29, 2024 | 5:21 PM

२ तारखेला बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत तर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि वंदना चव्हाण यांच्या नावांचा उल्लेख पण शरद पवार यांचं नाव नाही.

मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४ : येत्या २ तारखेला बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत शरद पवार यांचं नाव नसल्याने एकच चर्चा सुरू झाल्या आहेत. तर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि वंदना चव्हाण यांच्या नावांचा उल्लेख कार्यक्रम पत्रिकेत केल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील हजर राहणार आहेत. मात्र शरद पवार यांच्या दौऱ्यात नमो महारोजगार मेळाव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पुणे विभागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बारामती येथे 2 व 3 मार्च रोजी आयोजित विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’च्या पार्श्वभूमीवर शुक्रवार 1 मार्च रोजी नोकरी विषयक कौशल्ये (सॉफ्ट स्कील्स), मुलाखत तंत्र या विषयांवर मेळावापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाच्या पत्रिकेत शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

Published on: Feb 29, 2024 05:19 PM
गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा, सनद निलंबित करण्यासंदर्भात ‘बार काऊंसिल’चा मोठा निर्णय
भाजपकडून कुणाला लोकसभेचं तिकीट? ‘या’ 6 जणांची समिती ठरवणार, कोणा-कोणाचा समितीत सहभाग?