शिरूरमधून अमोल कोल्हे यांच्या जागी नाना पाटेकर निवडणूक लढणार? पुन्हा केलं मोठं वक्तव्य
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना तुम्ही शिरूर मधून अमोल कोल्हेंच्या जागी तुम्ही निवडणूक लढवणार का? असा सवाल केला. यावर नाना पाटेकर म्हणाले...
मुंबई, ११ मार्च २०२४ : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना तुम्ही शिरूर मधून अमोल कोल्हेंच्या जागी तुम्ही निवडणूक लढवणार का? असा सवाल केला. यावर नाना पाटेकर म्हणाले, “मला सगळ्याच राजकीय पक्षांकडून ऑफर मिळाली. मला ऑफर असली तरी मीही ऑफर स्वीकारणार नाही. कारण राजकारण हा माझा प्रांत नाही. तिथे गेलो तर आत्ता जे काम करतो आहे ते काम करण्यात जे समाधान आहे ते मला मिळणार नाही. मनात आलेलं सगळं आपण बोलू देतील माहीत नाही. तसंच किती राहू देतील ते पण माहीत नाही. त्यामुळे आम्ही नामच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहोत” असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. पुढे नाना पाटेकर असेही म्हणाले की, मला फक्त तुम्ही कळवा मी कुठून निवडणूक लढवणार आहे ते. मी खूप ठिकाणांहून निवडणूक लढवणार अशा चर्चा ऐकतो. एकदा मला सांगा की मी कुठून निवडणूक लढवणार, असंही मिश्किलपणे त्यांनी यावेळी म्हटले.