सारं जग सुंदर म्हणणारे नाना का चिडले? ‘त्या’ प्रकारामुळे नाना पाटेकर होतायत ट्रोल

| Updated on: Nov 16, 2023 | 1:15 PM

चाहत्याच्या डोक्याला चिडलेल्या नाना पाटेकरांनी टपली मारल्यामुळे नाना पाटेकर सध्या चांगलेच ट्रोल होताना दिसताय. वाराणसीमध्ये नाना पाटेकरांच्या जर्नी या चित्रपटाचं शुटिंग सुरू होतं. तेव्हा हा प्रकार घडला. यानंतर नेटकऱ्यांनी क्रांतीवीर या चित्रपटातील त्यांचाच डायलॉग केला व्हायरल

मुंबई, १६ नोव्हेंबर २०२३ | सोशल मीडियावर अभिनेते नाना पाटेकर चांगलेच ट्रोल होतायत. नाना पाटेकरांच्या एका चित्रपटाचं शुटिंग सुरू होतं. या शुटिंगदरम्यान एक चाहता त्यांच्याजवळ सेल्फी घेण्यासाठी आला मात्र यानंतर जे घडलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चाहत्याच्या डोक्याला चिडलेल्या नाना पाटेकरांनी टपली मारल्यामुळे नाना पाटेकर सध्या चांगलेच ट्रोल होताना दिसताय. वाराणसीमध्ये नाना पाटेकरांच्या जर्नी या चित्रपटाचं शुटिंग सुरू होतं. तेव्हा हा प्रकार घडला. यानंतर नेटकऱ्यांनी कुणाच्याही डोक्याला मारू नये, क्रांतीवीर या चित्रपटातील त्यांचाच डायलॉग व्हायरल केलाय. चित्रपटाच्या शुटिंगवेळी एकाग्रता महत्त्वाची असते ही बाब महत्त्वाची असते. मात्र चाहत्यांचा आतताईपणामुळे राग येणं साहजिक आहे. साध्या पाखराला इजा झाल्यावर हळहळणाऱ्या नाना पाटेकरांचं ट्रोलिंग झालंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Nov 16, 2023 01:15 PM
अजित पवार यांचा डेंग्यू गेला पण राजकीय ‘ताप’ कायम? अजितदादांच्या डेंग्यूवर रामदास कदम यांनाच शंका?
जरांगे पाटील यांचं माळी समाजाकडून कुठं झालं दणक्यात स्वागत? १०० JCB तून फुलांची उधळण, बघा Grand Welcome