नाना पटोलेंच्या कारला अपघात, थोडक्यात बचावले; ‘त्या’ रात्री दीड वाजता नेमकं काय घडलं
भंडाऱ्यातून परतताना भरधाव ट्रकने नाना पटोले यांच्या कारला धडक दिली. मात्र हा खरच घातपात आहे का याची चौकशी करा, अशी मगणी काँग्रेसने केली आहे. नाना पटोले भंडाऱ्यातून प्रचार करून आपल्या राहत्या गावी सुकळीला येत होते. काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळेंसाठी गणेशपूरमधील सभा आटोपून रात्री दीड वाजता गावी येत होते. त्यावेळी काय घडलं?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला अपघात झाला. भरधाव ट्रकने नाना पटोले यांच्या कारला धडक दिली. मात्र झालेल्या या घातपातावरून काँग्रेसने शंका उपस्थित केली आहे. भंडाऱ्यातून परतताना भरधाव ट्रकने नाना पटोले यांच्या कारला धडक दिली. मात्र हा खरच घातपात आहे का याची चौकशी करा, अशी मगणी काँग्रेसने केली आहे. नाना पटोले भंडाऱ्यातून प्रचार करून आपल्या राहत्या गावी सुकळीला येत होते. काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळेंसाठी गणेशपूरमधील सभा आटोपून रात्री दीड वाजता गावी येत होते. त्याचवेळी रस्त्यात एका कडेला थांबलेल्या नाना पटोले यांच्या कारला मागून ट्रकची धडक बसली. अपघात झाला त्यावेळी नाना पटोले त्यांच्या सहकाऱ्यांसह कारमधून चहा पिण्यासाठी उतरले होते. कारमध्ये कोणीही नसल्याने कोणालाही इजा झाली नाही, मात्र कारचा मागच्या बाजूने चक्काचूर झाला. बघा नेमका कुणाचा होता डाव? काँग्रेसला कुणावर शंका?