‘हा केवळ कमिशनचा व्यवहार’, आनंदाचा शिधावरून विरोधकांचा निशाणा, कुणाचा आरोप?

| Updated on: Oct 04, 2023 | 10:37 AM

VIDEO | दरवर्षी यंदाही गरिबांना दिवाळीनिमित्त शंभर रूपयात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळबैठकीत झालेल्या निर्णयात गोर-गरिबांना आणि शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या १०० रूपयांच्या आनंदाचा शिध्यात मैदा आणि पोह्याचाही समावेश असणार आहे.

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३ | दरवर्षीप्रमाणे यंदाही गोरगरिबांना दिवाळीनिमित्त शंभर रूपयात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. नुकतीच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत यासंदर्भात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी या आनंदाच्या शिध्यात मैदा आणि पोह्याचा समावेश करण्यात येणार आहे. यापूर्वी या आनंदाचा शिध्यामध्ये रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे चार पदार्थ होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये १ किलो साखर, १ लीटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे अशा पदार्थांचा एकत्रित आनंदाचा शिध्यात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून देण्यात येणाऱ्या आनंदाच्या शिध्यावरून विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘आनंदाच्या शिधा देण्याच्या नावावरून सगळा कमिशनचा व्यवहार चाललेला आहे. या शिंदे सरकारमध्ये आनंदाच्या शिधाच्या नावाने लोकांना लालच देण्याचं काम सुरू आहे. यांचही टेंडर निर्मल भवमध्येच होणार असून राज्यात फक्त लूट सुरू आहे.’ असे म्हणत नाना पटोले यांनी टीका केली आहे.

Published on: Oct 04, 2023 10:18 AM
Ajit Pawar मंत्रिमंडळ बैठकीला का गैरहजर होते? छगन भुजबळ यांनी सांगितलं कारण, म्हणाले…
पंकजा मुंडे यांचं राजकीय ‘चेक’मेट? साखर कारखाना अडचणीत अन् आले मदतीचे धनादेश