Nana Patole | भाजपचा OBCवर आधीपासून अन्याय, आरक्षण न मिळण्यासाठी भाजप जबाबदार : नाना पटोले

| Updated on: Sep 12, 2021 | 7:42 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजपच जबाबदार आहे, असा आरोप केला आहे.

नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजपच जबाबदार आहे, असा आरोप करतानाच केंद्र सरकारने तातडीने इम्पिरिकल डेटा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. राज्य सरकारने मागास आयोग तयार करावा. त्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा तयार करावा आणि पुन्हा कोर्टात यावे, असा सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्याकडील डेटा आम्हाला द्यावा. तो कोर्टात दिल्यास ओबीसींना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

Published on: Sep 12, 2021 07:42 PM
Nashik | नांदुर्डी येथे मध्यरात्री बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण
Fast News | महत्वाच्या बातम्या |