नाना पटोले यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज – बावनकुळे
पुन्हा एकदा नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे हे आमने -सामने आल्याचे पहायला मिळत आहे. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
नागपूर : पुन्हा एकदा नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे हे आमने -सामने आल्याचे पहायला मिळत आहे. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. नाना पटोले हे नेहमीच वादग्रस्त व्यक्तव्य करत असतात. त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसची देखील प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.