Video | शरद पवारांचं माझ्यावर प्रेम आहे आणि नेहमी राहील : नाना पटोले
शरद पवारांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ते माझ्यावर नाराज नाहीत, असे नाना पटोले म्हणाले.
मुंबई : स्वबळाचा नारा आणि वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्याला उत्तर देताना शरद पवारांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ते माझ्यावर नाराज नाहीत, असे नाना पटोले म्हणाले. आमचा पक्ष बळकट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. सरकार आणि पक्ष हे दोन्ही वेगवेगळे आहे. तिन्ही पक्ष सरकार म्हणून चांगले काम करत आहेत, असे नाना पटोले म्हणाले.