Nana Patole | फडणवीस आणि मी मित्र असल्याने मिठी मारली, नाना पटोलेंनी सांगितलं कारण
राजीव सातव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवरील निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून, काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली. नाना पटोले यांनी या भेटीत देवेंद्र फडणवीस यांना मिठी मारली होती.
महाराष्ट्राचे महसूल मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची राज्यसभा निवडणुकीसंदर्भात भेट घेतली होती. या भेटीत राजीव सातव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवरील निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून, काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली. नाना पटोले यांनी या भेटीत देवेंद्र फडणवीस यांना मिठी मारली होती. नाना पटोलेंच्या मिठीची चर्चा चांगलीच रंगली होती. आम्ही दोघे मित्र असल्याने मिठी मारल्याची नाना पटोले यांनी म्हटलं आहे. आगामी स्थानिक संस्थाच्या निवडणूका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा नाना पटोले यांनी केलीय. दोनच्या प्रभाग पद्धतीच्या मागणी केली असून तसा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे दिला आहे. सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.