सत्ता गेल्यानंतर भाजप विचलित झालीय, नाना पटोलेंचा निशाणा

| Updated on: Jan 23, 2022 | 11:11 AM

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं देशाला भोगावं लागत आहे. देश विकला जातोय. भारतमाता की जय म्हणणारी भाजप देश विकत असेल तर भाजपनं त्याचं उत्तर द्यावं, असं नाना पटोले यांनी म्हटलंय.

भाजप मूळ विषयाला बाजूला सारण्याचा प्रयत्न करत आहेत. आज भाजपकडून देशाला अडचणीत आणून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं देशाला भोगावं लागत आहे. देश विकला जातोय. भारतमाता की जय म्हणणारी भाजप देश विकत असेल तर भाजपनं त्याचं उत्तर द्यावं. मूळ विषयाला डायवर्ट करण्यासाठी भाजपकडून हा प्रयत्न केला जातोय. ज्या गावगुंडाबद्दल बोललो तो गावगुंड समोर आला. शेतकऱ्यांनी चालू वीज बिल भरावीत, असं नाना पटोले म्हणाले. थकबाकीची वसुली होणार असेल काँग्रेस आणि नाना पटोले संघर्ष करतील, असं ते म्हणाले.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 23 January 2022 -tv9
बाळासाहेब ठाकरे म्हणजे सत्य, न्याय आणि स्वाभिमानाचं प्रतिक : संजय राऊत