Nana Patole : मी बोललो तर त्रास झाला, ते बोलले तर चालतं, स्वबळावरुन नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना कामाला लागा असे आदेश दिल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Nana Patole Slam Cm Uddhav Thackeray )
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना कामाला लागा असे आदेश दिल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते बोलले तर ठीक मात्र मी बोलले तर त्रास झाला, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असून देखील काँग्रेस कार्यकर्त्यांची कामं होत नसल्याची खंत यावेळी नाना पटोले यांनी बोलून दाखवली. त्यामुळे महा विकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा आहे. (Nana Patole Slam Cm Uddhav Thackeray )