Special Report | शरद पवारांचा चिमटा…काँग्रेसचा भडका!

| Updated on: Sep 10, 2021 | 8:54 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसला चिमटा काढला. काँग्रेसची अवस्था ही जमीन गमावलेल्या जमीनदारासारखी झाल्याचं शरद पवार म्हणाले. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा संतापाचा भडका उडाला आहे.

सध्या देशभरात काँग्रेसची स्थिती ही चिंताजनक आहे. देशभरातील विधानसभाच्या झालेल्या निवडणुकी असो किंवा स्थानिक स्तरावरच्या निवडणुका काँग्रेसला अपेक्षित यश काही मिळालेलं नाही. त्यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसला चिमटा काढला. काँग्रेसची अवस्था ही जमीन गमावलेल्या जमीनदारासारखी झाल्याचं शरद पवार म्हणाले. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा संतापाचा भडका उडाला आहे. काँग्रेसने ज्यांना जमीन राखायला दिली त्यांनीच जमीन चोरली, अशा तिखट शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Published on: Sep 10, 2021 08:54 PM
सरकारला बुद्धी येवो, ही प्रार्थना, Sandip Deshpande यांचा टोला
Special Report | मौका सभी को मिलता है, ‘सत्या’ चित्रपटातील डॉयलॉगमधून नितेश राणेंना काय सांगायचंय?