Nana Patole : नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा? विधानसभेतील दारूण पराभवानंतर मोठा निर्णय
महाविकास आघाडीला गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पादाचा राजीनामा देण्याची तरयारी दर्शविली आहे.
नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. महाविकास आघाडीला गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पादाचा राजीनामा देण्याची तरयारी दर्शविली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर आता नाना पटोले हे दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी २४ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीत नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी हायकमांडकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र नाना पटोले यांचा राजीनामा काँग्रेसच्या हायकमांडने अद्याप स्वीकारला नसल्याची माहिती आहे.