Special Report | मविआतच फोडाफोडी, नाना पटोलेंचा राष्ट्रवादीला इशारा
महापालिका निवडणुकांच्या आधीच महाविकास आघाडीमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. मालेगाव महापालिकेमधील काँग्रेसच्या 27 नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबई : महापालिका निवडणुकांच्या आधीच महाविकास आघाडीमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. मालेगाव महापालिकेमधील काँग्रेसच्या 27 नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. या नगरसेवकांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे मालेगाव महापालिकेतून काँग्रेसचे (congress) असित्व जवळपास संपल्यातच जमा आहे. मात्र हे फोडाफोडीचे राजकारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या चांगलेच जिव्हारी लागले असून, वेळ आल्यावर आम्ही देखील उत्तर देऊ असा इशारा पटोले यांनी दिला आहे.
Published on: Jan 27, 2022 09:50 PM