Nanded | नांदेडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याला 7 लाखांना लुटले
नांदेड शहर आणि जिल्ह्यात लुटमारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. बुधवारी रात्री मुख्य वस्ती असलेल्या गोकुळ नगर भागात सिमेंटचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचे बंदुकीचा धाक दाखवून सात लाख रुपये लंपास करण्यात आले आहे. घटनेतील चार आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.
नांदेड शहर आणि जिल्ह्यात लुटमारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. बुधवारी रात्री मुख्य वस्ती असलेल्या गोकुळ नगर भागात सिमेंटचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचे बंदुकीचा धाक दाखवून सात लाख रुपये लंपास करण्यात आले आहे. घटनेतील चार आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. गोकुळ नगर भागात पूर्णा येथील हनुमान अग्रवाल यांची बालाजी ट्रेडिंग कंपनी नावाने सिमेंट विक्रीची दुकान आहे. अग्रवाल यांच्याकडे पाच नोकर कामाला आहेत. त्यातील एक सुट्टीवर होता. तर इतर तिघे रात्री साडे सात वाजता दुकानात होते. तर एक नोकर काही वेळापूर्वी दुकानातून निघून गेला होता. त्याचवेळी दोन आरोपी दुकानात शिरले. त्यांनी नोकरांना बंदूक अन चाकुचा धाक दाखवून सात लाख रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली. काही वेळातच एका दुचाकी वरुन चार आरोपी पसार झाले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले.