लाडक्या बहिणीसाठी पात्र ठरलेल्या महिलांचा सन्मान म्हणून काही ठिकाणी स्थानिक भाजप नेते मोफत साड्या वाटप करतायत. मात्र या कार्यक्रमात लाडक्या बहिणींचा सन्मान होतोय की अपमान, असा प्रश्न महिलाच विचारु लागल्या आहेत. नांदेडच्या हदगावातल्या जगापूरमधली ही दृश्यं आहेत. इथं भाजपकडून विधानसभेला इच्छूक असलेल्या कैलास राठोडांनी मोफत साड्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला. मात्र महिलांच्या गर्दीमुळे इथं चेंगराचेंगरी होता-होता राहिली. कशी-बशी वाट काढून महिला गेटबाहेर पडत होत्या आणि गेटबाहेर उभे असलेले भाजपचे कैलास राठोड महिलांच्या हाती साडीची पिशवी थांबवत होते. हाल झालेल्या महिलांनी आयोजकांना शिव्या-शाप दिले. तर दुसरीकडे भाजपचे कैलास राठोड मात्र लाडक्या बहिणींना सन्मानासाठी हा कार्यक्रम केल्याचा दावा करत होते. साड्या खराब निघाल्याच्या आरोपात अनेकांनी साड्यावाटप करणाऱ्या लोकांच्या अंगावरच त्या फेकून दिल्या. कार्यक्रमात महिलांचा आहे हे माहित असूनही गर्दी हाताळण्यासाठी महिला पोलिस दिसत नव्हत्या. ३ दिवसांपूर्वी नांदेडच्याच हदगावातल्या तामसा गावात असाच प्रकार घडला. बघा स्पेशल रिपोर्ट नेमकं काय घडलं?