Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणी’चे पैसे हडप, ‘त्यानं’ 33 जणांचं वापरलं आधारकार्ड अन्…

| Updated on: Sep 30, 2024 | 2:15 PM

राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कऱण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या दिवसापासून आणली त्या दिवसापासून ही योजना चर्चेत आहे. कुठे या योजनेतून महिलांना मिळणाऱ्या पैशांनी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय तर कुठे या महिलांच्या नावे असणाऱ्या योजनेचा गैरवापर करून लाडक्या बहिणींना गंडा घातला जात आहे.

Follow us on

लाडक्या बहिणीचे पैसे पतीच्या खात्यात जमा करून योजनेतून मिळणारी रक्कम सीएससी केंद्र चालकाने हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील मनाठा येथे प्रकार घडला आहे. लाडक्या बहिणी योजनेचे अर्ज भरताना महिलांचा आधार नंबर टाकण्याऐवजी त्यांच्या पतीचा आधार नंबर टाकण्यात आला, रोजगार हमी योजनेचे पैसे आणि इतर योजनेचे पैसे आले आहेत असे सांगून या सीएससी केंद्र चालकाने या अनेकांची आधार कार्ड, बँकेचे पास बुक जमा केले आणि चांगलाच मोठा गंडा लाडक्या बहिणींना घातला. आधार कार्ड, बँकेचे पास बुक या कागद पत्राच्या आधारावर सीएससी केंद्र चालकाने अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यातील पैसे स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले. मनाठा या गावातील 38 तर बामणी फाटा येतील 33 जणांचा आधार क्रमांक वापरून 3 लाख 19 हजार 500 रुपय परस्पर केंद्र चालकाने उचलले आणि हा प्रकार अनेकांच्या लक्षात आल्यानंतर या सीएससी केंद्र चालकांचे बिंग फुटले. सध्या हे केंद्र चालक फरार असून या प्रकारामुळे मात्र खळबळ उडाली आहे.