अर्ज ‘लाडक्या बहिणीं’चे अन् कागदपत्र भावांचे… पैसे घेतले तिसऱ्यानेच; महिलांना कोणी घातला गंडा?

| Updated on: Oct 01, 2024 | 10:43 AM

लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी अर्ज दाखल केलेत. त्या अर्जासाठी कागद मात्र पुरूषांचे जोडले गेलेत आणि सरकारकडून आलेले लाडक्या बहिणींसाठीचे ३ लाख रूपये घेऊन लाडक्या बहिणींचे अर्ज भरणारा केंद्र चालकच फरार झालाय.

Follow us on

नांदेडमध्ये लाडक्या बहीण योजनेतील मोठा घोटाळा उघड झालाय. बनावट कागदपत्रांनी लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या भावांच्या नावाने काढले गेले आणि हा सगळा प्रकार करणारा डिजीटल केंद्र चालकच जवळपास साडे तीन लाख रूपये हडपून पसार झालाय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका येथील मनाठा येथे हा प्रकार घडला. अनेक गावात सरकारच्या योजना मिळाव्या म्हणून डिजीटल केंद्र आहेत. मनाठा या गावात ज्यांच्याकडे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यानेच अपहार करून पोबारा केला. गावातील अनेक महिलांसह आजूबाजूच्या गावातील काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेत. या सर्व महिलांची कागदपत्र डिजीटल केंद्र चालक यांच्याकडे जमा होती. यानंतर केंद्र चालकाने गावातील महिलांचे पैसे येणार आहे, असे सांगून गावातील काही पुरूषांचे आधारकार्ड आणि पासबुक मागितली. प्रत्यक्षात महिलांचे अर्ज भरताना या केंद्र चालकाने महिलांच्या अर्जासोबत पुरूषांचे अधारकार्ड जोडले. याद्वारे त्याने ३ लाख १९ हजार लाडक्या बहिणीचे पैसे जमा करून ते काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला.