VIDEO : Nanded MLA Phone Switch Off | नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकरांचा देखील फोन बंद

| Updated on: Jun 21, 2022 | 2:25 PM

विधानपरिषद निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीची मते फोडण्यात भाजपला यश मिळाले. मात्र, त्यानंतर राज्यातील राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे तब्बल 29 आमदार फुटले आहेत. एकनाथ शिंदेंनी शिवसेनाच हायजॅक केलीये. गेल्या काही तासांपासून शिंदे हे नॉट रिचेबल होते. नांदेड उत्तरचे आमदार  बालाजी कल्याणकरांचा देखील फोन बंद येत असल्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत तेही असल्याचा अंदाज आता व्यक्त केला जातोय.

विधानपरिषद निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीची मते फोडण्यात भाजपला यश मिळाले. मात्र, त्यानंतर राज्यातील राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे तब्बल 29 आमदार फुटले आहेत. एकनाथ शिंदेंनी शिवसेनाच हायजॅक केलीये. गेल्या काही तासांपासून शिंदे हे नॉट रिचेबल होते. नांदेड उत्तरचे आमदार  बालाजी कल्याणकरांचा देखील फोन बंद येत असल्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत तेही असल्याचा अंदाज आता व्यक्त केला जातोय. कल्याणकर हे नांदेडमध्ये शिवसेनेचे काम मोठ्या जोमाने करतात. मात्र, फुटलेल्या आमदरांमध्ये त्यांचे देखील नाव आल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे. रात्री उशीरा शिवसेनेने आमदारांची बैठक बोलावली होती. त्याच बैठकीला एकनाथ शिंदे आणि 29 आमदार गैरहजर होते.

Published on: Jun 21, 2022 02:25 PM
VIDEO : Raosaheb Danve on MVA | पुढील काळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत – रावसाहेब दानवे
VIDEO : Sharad Pawar | अडीच वर्षापासून सरकार पाडण्याचा प्रयत्न : शरद पवार