अवघ्या साडेतीनशे रुपयात देशी जुगाड, शेतकऱ्यानं बनवलेलं वखरणी यंत्र तुम्ही पाहिलंत का?

| Updated on: Aug 04, 2023 | 3:48 PM

VIDEO | वेळ आणि पैशांची बचत करण्याचा शेतकऱ्याचा देशी जुगाड पाहून तुम्ही म्हणालं कम्माल! बघा व्हिडीओ

नांदेड, ४ ऑगस्ट २०२३ | सध्या नांदेड जिल्ह्यात एकच चर्चा सुरूये ती म्हणजे नांदेडच्या कृष्णुर गावातील बालाजी जाधव यांची… कारणही तसंच आहे. नांदेडच्या कृष्णुर गावातील बालाजी जाधव यांनी मोटारसायकलीच्या मदतीने वखरणी यंत्र बनवलं आहे. या वखरणी यंत्राला ना बैलांच्या जोडीची गरज असल्याचे दिसतंय. सध्या अवकाळी पावसानं बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे आपल्या गुरा-ढोरांना कसं वाढवायचं असा प्रश्न त्यांच्यापुढे सध्या आहे. अशातच बैलांच्या मदतीने वखरणी करताना वेळ आणि अधिकचा पैसा खर्च होत असल्याने जाधव यांनी स्वतःच हे देशी जुगाड तयार केलय. या मोटारसायकलीच्या माध्यमातून वखरणी करत जाधव आपल्या शेताची निगा राखतायत. त्यांनी तयार केलेले हे देशी जुगाड पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केलीय. अवघ्या साड़े तीनशे रुपये खर्च करत जाधव यांनी बनवलेले हे जुगाड सध्या आकर्षणाचा विषय बनलंय.

Published on: Aug 04, 2023 03:48 PM
शिवसेना कोणाची? विधानसभेत आशिष शेलार अन् भास्कर जाधव आमने-सामने
‘आ रहा हूं, सवाल… ‘, सुप्रीम कोर्टातून राहुल गांधी यांना दिलासा मिळताच काँग्रेस गर्जली, दिला इशारा