‘चुलीत गेले नेते अन् चुलीत गेले पक्ष’, ‘या’ जिल्ह्यातील गावात नेत्यांना बंदी; काय आहे कारण?

| Updated on: Sep 12, 2023 | 5:21 PM

VIDEO | नांदेड जिल्हयातील अर्धापूर तालुक्यातील मेंढला आणि उमरी या दोन गावात नेत्यांना गावबंदी, मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांना गावात गावकऱ्यांनी नाकारला प्रवेश

नांदेड, १२ सप्टेंबर २०२३ | नांदेड जिल्हयातील अर्धापूर तालुक्यातील मेंढला आणि उमरी या दोन गावात नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. इतकेच नाही तर अशा आशयचे फलक या दोन्ही गावात लावण्यात आले आहेत. चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण हेच आमचं लक्ष… मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांना गावात प्रवेश नाही, असा मजकूर या फलकावर आहे. मेंढला येथील गावकऱ्यांनी नेत्याच्या गावबंदिसह मतदानावर बहिष्कार घालन्याचा देखील निर्णय घेतला आहे. उमरी गावात देखील असे फलक लावण्यात आले आहेत. दोन्ही गावातील काही तरुण जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला देखील बसले आहेत. एकूणच नांदेडमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Published on: Sep 12, 2023 05:21 PM