Nanded | नांदेडमध्ये ग्रामीण भागात गौराईचा उत्साह, आकर्षक देखाव्यांची सजावट
नांदेडमध्ये ग्रामीण भागात गौराईचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. मुखेड मधल्या सदाशीव पाटील यांच्या घरी छत्रपती शिवरायांचा आकर्षक देखावा गौराईसमोर सजवण्यात आला होता. 19 जणांचे एकत्रित कुटुंब असलेल्या पाटील यांच्या घरी सर्व सदस्यांनी एकत्र येत गौराईची आराधना केलीये.
नांदेडमध्ये ग्रामीण भागात गौराईचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. मुखेड मधल्या सदाशीव पाटील यांच्या घरी छत्रपती शिवरायांचा आकर्षक देखावा गौराईसमोर सजवण्यात आला होता. 19 जणांचे एकत्रित कुटुंब असलेल्या पाटील यांच्या घरी सर्व सदस्यांनी एकत्र येत गौराईची आराधना केलीये. यंदा दमदार पावसाने साथ दिल्याने गौराईचे सर्व लाड अगदी थाटात पुरवण्यात आल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसलय. एकत्र कुटुंब पद्धती जोडून ठेवणाऱ्या गौराईच्या या सणासाठी ग्रामीण भागात सगळे कुटुंब एकत्र आल्याचे पहायला मिळालंय.