Nandedमधील विद्यार्थ्याचे दारू दुकानाच्या परवान्यासाठी शिक्षणमंत्र्यांना निवेदन

| Updated on: Jan 12, 2022 | 12:21 PM

राज्यात शाळा, विद्यालये तसेच महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. मात्र याच शिक्षणपद्धतीला नांदेडमधील विद्यार्थी पवन जगडमवार याने विरोध केला आहे.

मुंबई : राज्यात शाळा, विद्यालये तसेच महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. मात्र याच शिक्षणपद्धतीला नांदेडमधील विद्यार्थी पवन जगडमवार याने विरोध केला आहे. त्याने ऑनलाईन शिक्षणातून बोगस डिग्री देण्यापेक्षा दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी केली आहे. या विद्यार्थ्याने थेट उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी अनंत अडचणी आहेत. यामध्ये प्रत्यक्ष ज्ञान मिळत नाही. त्यामुळे पोट भरण्यासाठी दारूच्या दुकानाचा परवाना द्यावा, असे या विद्यार्थ्याने आपल्या पत्रात म्हटले आहे. या अजब मागणीची राज्यात तसेच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

मच्छीमाराच्या जाळ्यात अडकले दुर्मिळ मासा, जाळे तोडून माशांना दिले जीवदान
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 12 January 2022