Nanded | नांदेड जिल्हयात गारपिटीसह जोरदार पाऊस, शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान
नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली. मुखेड तालुक्यातील बाहऱ्हाळी परिसरालाही गारपीटीने झोडपून काढले.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली. मुखेड तालुक्यातील बाहऱ्हाळी परिसरालाही गारपीटीने झोडपून काढले. देगलूर, मुखेड शहर व तालुक्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. पावसाची चिन्हे दिसतात, मात्र पाऊस पडत नाही असा अनुभव नागरिकांनी घेतला आहे..मात्र सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. या मुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.