‘तुझा मर्डर फिक्स…’, सुहास कांदेंची समीर भुजबळांना उघड धमकी, नांदगाव मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा

| Updated on: Nov 20, 2024 | 1:16 PM

नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठा राडा झाला. आज मतदानाच्या दिवशी सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी रोखलं म्हणून नांदगाव-मनमाड रस्त्यावर दोन्ही गटात मोठा राडा झाला.

विधानसभा निवडणुकीचं आज राज्यभरात मतदार पार पडत असताना नांदगाव मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे यांच्याकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना मारून टाकण्याची धमकी देण्यात आली. तर तुझा मर्डर फिक्स आहे, असे म्हणत सुहास कांदे यांच्याकडून समीर भुजबळ यांना थेट धमकी दिली आहे. आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. अशातच नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठा राडा झाला. आज मतदानाच्या दिवशी सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी रोखलं म्हणून नांदगाव-मनमाड रस्त्यावर दोन्ही गटात मोठा राडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मतदार मतदानाला निघाले होते मात्र समीर भुजबळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना अडवल्याने हा राडा झाला. या मोठ्या राड्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना शांत केलं. दरम्यान, सुहास कांदे यांनी बोलाविलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवलं आहे. यावेळी समीर भुजबळ आणि सुहास कांदे समोरासमोर आलेत आणि तुझा मर्डर फिक्स आहे, अशी सुहास कांदे यांनी समीर भुजबळांना उघड धमकी दिली.

Published on: Nov 20, 2024 01:14 PM
सदा सरवणकरांच्या ‘धनुष्यबाणा’ला अमित ठाकरेंचा आधार, मतदानापूर्वी दोघं आमने-सामने अन्…, व्हिडीओ व्हायरल
बारामतीत राडा, युगेंद्र पवारांची आई मतदानकेंद्रावर; अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांवर भडकल्या, कारण काय?