एकीकडे अवकाळीनं बळीराजा उद्ध्वस्त तर ‘या’ जिल्ह्यात समाधानी, काय आहे दिलासा मिळण्याचं कारण?

| Updated on: Apr 24, 2023 | 2:19 PM

VIDEO | 'या' जिल्ह्यात मिरचीची विक्रमी आवक, हंगामाच्या शेवटी ओल्या मिरचीला चांगला भाव, यंदा दोन लाख १३ हजार क्विंटल पेक्षा अधिक विक्री

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी मिरचीने विक्रमी आवक बाजार समितीत दाखल झाली आहे. तर हंगामाच्या शेवटी ओल्या लाल मिरचीला भाव देखील चांगला वाढून मिळत आहे. यावर्षी मिरचीला मागील वर्षापेक्षा दुप्पट भाव मिळत असून सध्या ओली लाल मिरचीला पाच हजार १०० चा भाव मिळत आहे, तर सुखी लाल मिरचीला दहा हजार पासून ते सोळा हजार पर्यंतच्या दर मिळत आहे. मिरचीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. सुरुवातीला मिरचीला चांगला भाव मिळाला होता, मात्र आवक वाढल्याने भाव घसरला असल्याने, शेतकऱ्यांनी मिरची विक्रीकडे पाठ फिरवली होती, परंतु हंगाम संपण्यात आला असून, मिरची पुन्हा विक्रीला सुरुवात झाली आह. यावर्षी मिरची दोन लाख १३ हजार क्विंटल पेक्षा अधिक विक्री झाली आहे तर आणखीन काही दिवस हंगाम सुरू राहणार असल्याने हा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत.

Published on: Apr 24, 2023 02:19 PM
अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक झाले अन् थेट पुणे विद्यापीठात घुसले, राडा करण्याचं कारण काय?
‘डेथ वॉरंट’वर राष्ट्रवादी नेत्याचे स्पष्टीकरण, राऊत दिल्लीत काम करतात, त्यांच्याकडे माहिती असेल, पण हे सरकार…